Astrology | प्रत्येकाला आपले स्वप्नातले घर (Home) खरेदी करण्याची इच्छा असते. परंतु प्रत्येकाकडे घर खरेदीसाठी लाखो रुपये असतातच असे नाही. काही जणांना पैशांची कमतरता असते. त्यामुळे ते घर कर्ज (Home Loan) काढून खरेदी करतात. तुम्ही पाहिले असेल की नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी त्याची वास्तूशांती करतात. वास्तूशांती का करतात? यामागचे कारण 99 टक्के लोकांना माहिती नाही. जाणून घेऊयात यामागचे खरे कारण. (Latest Marathi News)
Sanjay Shirsath । “हिम्मत असेल तर अजित पवारांना गद्दार म्हणून दाखवा” संजय शिरसाठ यांचे मोठे वक्तव्य
या कारणासाठी करतात शुभ मुहूर्तावरच वास्तूशांती
ज्योतिष शास्त्रानुसार गृहप्रवेशाच्या पूजेने घरात सुख-समृद्धी येते तसेच घरातील नकारात्मकता दूर होते. आकाश, जल,पृथ्वी, अग्नी आणि वायू हे सृष्टीचे पाच मुख्य घटक खूप महत्त्वाचे आहेत. जर वास्तुशांती केली तर हे घटक शांत होतात. सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. वास्तुशांती करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की वास्तुशांती फक्त शुभ मुहूर्तावरच करतात.
Samruddhi Mahamarg । समृद्धी महामार्गावर 8 महिन्यांमध्ये 729 अपघात! अहवालात धक्कादायक माहिती समोर
अनेकांना इच्छेनुसार घर किंवा फ्लॅट मिळत नाही. दोष दूर करण्यासाठी वास्तुशांती करावी. जे तुम्ही असे केले नाही तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस शुभ असून शुक्ल पक्षातील द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी या तिथीला वास्तुशांती करावी. तसेच अश्विनी, उत्तरफाल्गुनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, उत्तराषाद, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, श्रावण, रेवती, शतभिषा, स्वाती, अनुराधा ही नक्षत्रे शुभ आहेत.
Samsung Galaxy A54 5G । वाचतील हजारो रुपये! सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळेल 25,500 रुपयांपर्यंत सवलत
या दिवशी करू नका वास्तुशांती
चुकूनही वास्तुशांती चंद्रग्रहण, सूर्यग्रहण,चांद्रमास या दिवशी करू नये. एका धार्मिक पुस्तकानुसार, शुक्र तारा आणि गुरु तारा अस्त वा स्थिर होत असताना वास्तुशांती करणे टाळावे. तसेच वास्तुशांती शुभदिवस आणि वेळ या स्थानावर आधारित असतात.
Sharad Pawar । राज्यावर दुष्काळाचे सावट! शरद पवारांनी दिल्या सरकारला महत्त्वाच्या सूचना