मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन वादग्रस्त वक्तव्य केले. या वादग्रस्त वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय. त्याचबरोबर अजून नेत्यांची या वादात उडी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चाना उधाण आले आहे.
Navneet Rana: नवनीत राणांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल! पाहा VIDEO
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
देवी सरस्वतीला कोणी पाहिलं आहे का? असा प्रश्न भुजबळांनी भर कार्यक्रमामध्ये केला आहे. त्याचबरोबर पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असंहि छगन भुजबळ म्हणाले. शाळेत सरस्वतीचा फोटो कशालापाहिजे? शाळांमध्ये महात्मा फुले, डॉ.बबसाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे.
अरे वा भारीच की! ‘या’ जिल्ह्यात गवती चहाच्या शेतीचा 250 एकरवर यशस्वी प्रयोग
छगन भुजबळांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आनंद दवे (Anand Dave) यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, शारदा यांना कोणीच पाहिले नाही. मग उद्या गणपतीचे फोटो पण नाकारणार का? यांना हिंदू दैवतांचाच राग का आहे असा प्रश्न देखील आनंद दवेंनी उपस्थित केलाय.
Shivsena: शिवसेनेच धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी