
Marriage Survey । सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची तयारी सुरु आहे. सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत धुमधडाक्यात लग्न करताना पाहायला मिळत आहे. सध्या समाजात लग्नाविषयी मत बदलले आहे. काही भागात असणाऱ्या लग्नाविषयीच्या काही जाचक रूढी देखील बंद झाल्या आहेत. अशातच आता एक धक्कादायक रिपोर्ट (Survey of Marriage) समोर आला आहे. (Latest marathi news)
सर्व्हेमध्ये ४९ टक्के पुरुष सिंगल असताना खूश असल्याचे समोर आले आहे तर ६१ टक्के महिलांना एकटे राहायचे आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सिंगल महिलांमधील ७५ टक्के महिला आणि ६५ टक्के पुरुषांनीही लग्नाचा विचार केलाय नाही. या सर्व्हेनुसार, लग्नासारख्या पवित्र नात्याची जबाबदारी पुरुषांपेक्षा महिलांवर मोठ्या प्रमाणात असते.
Ghazipur News । अतिशय भीषण अपघात! लग्नाला चाललेल्या बसवर पडली हायव्होल्टेज विजेची तार
महिलांना या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी वेळ काढता येत नाही. पुरुष प्रधान देशात मुलींची घुसमट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्या त्यांच्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करत असून मुलींना त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगायचं आहे. इतकेच नाही तर काही मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आनंदी असल्याने त्यांना लग्न करू वाटत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीमध्ये गुंतायचं असल्याने त्या लग्नापासून लांब राहत आहेत.