ऊस राहतोय का काय? या भीतीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होतेय लूट

Why is sugarcane staying? Because of this fear, sugarcane farmers are being looted

चालू गाळप हंगाम संपायला आला आहे. यामुळे सगळीकडेच वेगात ऊसतोड सुरू आहे. दरम्यान ऊसतोड मजूर व यंत्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करून ऊसतोड मजूर व यंत्रचालक एकरी पाच ते सहा हजार घेत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी देखील ऊस तुटला जाईल की नाही? या भीतीपोटी पैसे देत आहेत.

सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वतःच केला याबाबत मोठा खुलासा, म्हणाले…

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहीला होता. यामुळे यंदाच्या हंगामात ऊस ( Sugarcan) वेळेत तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. राज्यातील बहुतेक कारखान्यांची अजून आडसाली ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे पूर्व व सुरू हंगामातील ( Sugarcan Season) उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. या परिस्थितीत आपला ऊस शेतात पडून राहू नये. ही चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ जवळच्या विश्वासू नेत्याने दिला राजीनामा

शेतकऱ्याने उसाची नोंदणी करूनदेखील कारखान्याचे चिटबॉय सोडून मुकादम स्वतःच उसाचे फड ठरवत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मुकादम एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वाहनासाठी 300 ते 500 रुपयांचा दर देऊन देखील ड्रायव्हरला जेवणाचा डबा द्यावा लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस टोळीकडून लूट सुरूच आहे. या सर्व प्रकारामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

अशी दिसते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची लेक दिविजा; पाहा PHOTO

शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबबावी आणि लूटमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी ऊस उत्पादकत शेतकरी करत आहेत.

मोबाईल डेटा वाचवण्यासाठी वापरा ‘हा’ स्मार्ट उपाय; बंद करा ‘ही’ सेटिंग

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *