चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ( Gudhipadwa 2023) हा हिंदू नववर्षातील महत्त्वाचा सण मानला जातो. वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो. यामुळे लोक अनेक शुभ कामांची सुरुवात व छोटी-मोठी खरेदी या दिवशी करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र गुढी उभारली जाते. ही गुढी नव्या सुरुवातीचे,समृद्धीचे, आनंदाचे प्रतीक मानले जाते. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल रंगीबेरंगी गुढ्यांच्या वर तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो. असे का बरं केलं जातं असेल?
आत्ताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
खरंतर यामागे मोठे शास्त्र आहे. हिंदु धर्मानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी तांब्याचे तोंड जमिनीकडे असायला हवे. यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीमध्ये असलेली लिंबाची पाने व रेशमी वस्त्र हे सात्विक व प्रसन्न लहरींनी भारी बनते. तसेच जमिनीच्या आकर्षण शक्तीमुळे प्रसन्न लहरी जमिनीच्या दिशेने प्रवाहित होतात. ( Gudhipadwa richuals)
याचा फायदा जमिनीला (Land) होतो. कलशामधील लहरींमुळे जमीन आणि जमिनीलगतच्या मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाचे शुद्धीकरण होते. याउलट तांब्या सरळ ठेवला तर लहरी जमिनीच्या विरुद्ध दिशेने जातात आणि जमिनीचे शुद्धीकरण ( Purification) होत नाही. यामुळे गुढीवर तांब्याचा कलश हा उलटा ठेवला जातो. तसेच त्यावर शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक देखील काढले जाते.
आता थेट घरपोच वाळूविक्री होणार! राज्य सरकारने आखले नवीन धोरण