लहानांपासून मोठ्यांपर्यंत गोड खाण्याची इच्छा निर्माण झाली की आपण कॅडबरी खातो. परंतु या कॅडबरी मागचे सत्य हे तुम्हाला कोणालाच माहिती नाही. ही कॅडबरी जांभळ्या रंगाचीच का असते? असा देखील प्रश्न कधी कोणाला पडला नाही. परंतु सध्या सोशल मीडिया वरती सगळीकडे याच प्रश्नाची चर्चा सुरू आहे.
अहमदनगरच्या दंगलीवरून शरद पवार संतापले; म्हणाले, “या धर्माचा…”
1914 पासून कॅडबरी कंपनी ही कॅडबरीच्या कागदाचा रंग हा जांभळा वापरत आहे. जांभळा रंग हा राणी व्हिक्टोरियाचं जेव्हा निधन झालं त्यावेळी अर्पण करण्यात आला होता. जांभळा रंग हा सर्व रंगांमध्ये उठून दिसतो. 1854 मध्ये कंपनीला रॉयल वॉरंट म्हणून मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे कोको आणि चॉकलेट हे ब्रिटिश सम्राटासाठी उत्पादक बनले. 1920 मध्ये संपूर्ण डेअरी मिल्क सोनेरी आणि जांभळ्या रंगाने बनली. जांभळ्या रंगामुळे नेस्ले कंपनीने डेअरी मिल्कला कोर्टामध्ये खेचले.
सर्वसामान्यांसाठी दिलासदायक बातमी! खाद्य तेलाच्या किमतीमध्ये कपात, जाणून घ्या काय आहेत दर?
थॉमसन रॉयटर्सच्या व्यावहारिक कायद्यानुसार डेअरी मिल्क चॉकलेटला 2004 मध्ये पॅन्टोन 2865c या रंगाचा ट्रेडमार्क करायचा होता. परंतु नेस्ले कंपनीचा याला पूर्णपणे विरोध होता. त्यानंतर न्यायालयाने निकाल डेअरी मिल्क कंपनीच्या बाजूने दिला. कोर्टाने सांगितले की कॅडबरीचा जांभळा रंग’ कोणत्याही सुपरमार्केट किंवा स्पर्धकांद्वारे वापरण्यासाठी खुला आहे. त्यावेळी नेस्लेचे अपील फेटाळून न्यायाधीश कॉलिन बिर्स यांनी कॅडबरीच्या बाजूने निकाल जाहीर केला. व त्यांनी कॅडबरीचा मिल्क चॉकलेटसाठी जांभळा रंग वैशिष्ट्यपूर्ण रंग आहे असे देखील जाहीर केले.
आई कूठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे नव्या भुमिकेत, पोस्ट शेअर करत दिली ‘ही’ माहिती