हिंदू धर्मामध्ये अशा अनेक परंपरा आहेत ज्यामध्ये वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरातील जेष्ठ व्यक्ती जेवण करण्याआगोदर ताटाभोवती पाणी शिंपडतात, ही एक खूप जुनी हिंदू धर्मातील परंपरा आहे. आज आपण जेवण सुरू करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते त्याबद्दल माहिती पाहणार आहोत.
बापरे! डॉमिनोज पिझ्झ्यामध्ये आढळलेत काचेचे तुकडे; पाहा PHOTO
या परंपरेला उत्तर भारतात चित्रा आहुती म्हणतात आणि तामिळनाडूमध्ये परिसेशनम म्हणतात असे म्हणतात. पूर्वीच्या लोकांना जमिनीवर जेवण्यासाठी पान वाढले जायचे. त्यामुळे शेजारून कोणी चालत गेले तर त्याच्या पायाची धूळ आपल्या ताटामध्ये जाईल म्हणून पूर्वीचे लोक जेवण सुरू करण्यापुर्वी ताटाभोवती पाणी शिंपडायचे. त्यामुळे माती ताटामध्ये उडत नाही.
Urfi Javed: हाय गर्मी! उर्फी जावेदन वाढवलं इंटरनेटचं तापमान; पाहा VIDEO
त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे जेवणात दूषित घटक जाण्याचा धोका देखील कमी होतो. रात्रीच्या वेळेस जेवण करताना जर एखादा कीटक चालत आला तर तो स्पष्टपणे दिसत नसे अशावेळी जेवणापूर्वी पाणी शिंपडून माती ओली करणे फायदेशीर ठरत असे.
लाल मिरची उत्पादक अडचणीत, पावसामुळे लाल मिरची पडली काळी; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान