Tulsi Plant । हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व (Tulsi Importacne) आहे. तुळस ही फक्त अंगणाची शोभा वाढवत नाही तर वेगवेगळ्या शुभ कामांसाठी तुळशीचा (Tulsi) वापर केला जातो. असे म्हटले जात की भगवान विष्णु यांना तुळस खूप प्रिय आहे. त्यांच्या प्रसादात तुळशीच्या पानांचा उपयोग केला जातो. तुळशीमध्ये खूप औषधी गुण आढळतात. तुळशीची पाने रोज खाल्ल्यास अनेक रोगांपासून बचाव होतो. (Latest Marathi News)
जर घरामध्ये तुळशीचे रोपटे असेल तर ते खूप फायद्याचे मानले जाते. तुळशीची नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावून त्याची पूजा केली जाते. जर अंगणात तुळस असेल तर घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत नाही. परंतु रविवारच्या दिवशी तुळशीची पाने (Tulsi leaves) तोडू नयेत, शिवाय या दिवशी पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करू नये. अनेकांना यामागचे कारण माहिती नसते. जाणून घेऊयात सविस्तरपणे यामागचे कारण. (Astrology)
का तोडू नये तुळशीची पाने?
हिंदू धर्मात, तुळस ही वनस्पतीपेक्षा देवी तुळशीचे स्वरूप आहे. धार्मिक मान्यतांनुसार, रविवारी देवी तुळशी आणि विष्णू ध्यान-विश्रांतीमध्ये मग्न असतात. त्यांच्या या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून रविवारी तुळशीला जल अर्पण करणे आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नये.
Sana Khan Murder । सना खान हत्याकांडप्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!
या दिवशीही तोडू नये पाने
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त रविवारच नाही तर एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पाने तोडू नये. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करत असते. जर तुम्ही जल अर्पण केले तर तुळशीचा उपवास मोडतो. त्यामुळे रविवारी आणि एकादशीला तुळशीची लांबूनच पूजा करतात.