
मुंबई : रविवारी सकाळी सातच्या सुमारास इडीच पथक संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी पोहोचल. त्यांच्या घरातील कागदपत्र व दस्तावेज अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले व साडेअकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यांच्या घरी सापडलेल्या साडेअकरा लाखांचा हिशोब न देता येणे आणि चौकशीला सहकार्य न करणे या दोन आरोपांखाली त्यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी पावणे एक वाजता संजय राऊतांना अधिकृतपणे ED कडून अटक करण्यात आली. यावर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सार्वजनिक प्रतिक्रिया आली नाही. यावरूच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून या प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. यावरून एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
“संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, संजय राऊत यांना एकट पाडल जातय अशी चर्चा यावर काय प्रतिक्रिया द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही बोला ना मला फालतू प्रश्नाचे उत्तर द्यायचं नाही. कारण संजय राऊत यांचे आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहे मी त्यांच्या घरी देखील जाऊन आलोय”.
“नड्डांचं वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी नड्डा यांचे भाषण ऐकलं ते त्यात म्हणतात की काही लोक वीस तीस वर्ष काम करून भाजपात येतात. म्हणजे आम्हाला काही आचार विचार नाही आमचं कर्तृत्व शून्य.भाजपात लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे बेव वाक्य आहे”.
काय म्हणाले होते जे पी नड्डा?
“देशात आपल्या विरुद्ध लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष शिल्लक नाही. आपली खरी लढाई ही कुटुंबवाद आणि घराणेशाही यांच्या विरोधात आहे”. भाजप हा विचारधारेवर चालणारा देशातला एकमेव पक्ष आहे असाही उल्लेख त्यांनी केला. जस तमिळनाडूमध्ये घराणेशाही, शिवसेना संपत आलेला पक्ष तोही तसाच आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे देखील घराणेशाही आहे. काँग्रेस तर हा भाऊ बहिणीचा पक्ष झालाय. राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल ,तेलंगणा राष्ट्र समिती असा अनेक पक्षांचा उल्लेख त्यांनी केला. “काँग्रेसने कितीही प्रशिक्षण केंद्रं घेतली तरी त्यांना फायदा होणार नाही. टिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज लागते. दोन दिवसात पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत,” असा टोला देखील जे पी नड्डा यांनी लगावला.