मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेमध्ये (Shivsena)मोठी दरी निर्माण झाली आहे. तेव्हापासून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पाहायला मिळतायेत. हे दोन्ही गट कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की शिवसेना का फुटली? यामध्येच आता यासंदर्भात शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एक विधान केलं आहे.
शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार? ‘असा’ करा बचाव, वाचा सविस्तर
रामदास कदम म्हणाले, “जर खरंच शिवसेनेची ताकद असती, तर 50 आमदार आणि 12 खासदार आपल्याला सोडून गेले नसते, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावलाय. रामदास कदमांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
कौतुकास्पद! गुणवरे ता.फलटणच्या सानिया दयानंद गावडेची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड
पुढे रामदास कदम म्हणाले, “एक झेंडा, एक मैदान, एक विचार, एक नेता हे शिवसेना प्रमुखांच्या वेळी होते. राष्ट्रवादीमधून भाड्याने आणलेल्या नेत्यांना आमचं अंगावर सोडलं जात. याची सर्व उत्तरे आता उद्याच्या मेळाव्यामध्ये मिळतील”.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड यांच्यामार्फत खडकी येथे शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत वाटप