महाराष्ट्रातील अनेक मोठंमोठे प्रकल्प गुजरातला केले आहेत. याच मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर निशाणा साधला जातोय. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातल्या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. याबाबत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक ट्विट केले आहे.
मोठी बातमी! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, “Foxconn चे CEO यांनी नव्या गुंतवणुकीसाठी भारतात ८ दिवस दौरा केला, तेलंगणा सेमीकंडक्टरसाठी, कर्नाटक आयफोन प्रकल्पासाठी अशी अनेक राज्यांची शिष्टमंडळे त्यांना भेटली. परंतु १८-१८ तास जनसेवेची कामे करणारे आमचे धडाकेबाज सरकार #Foxconn च्या CEO यांना का भेटले नसावे?.”
नाद करा पण आमचा कुठं! ट्रॅक्टरने नव्हे तर महिंद्र THAR ने नांगरले शेत; लोक म्हणाले…
Foxconn चे CEO यांनी नव्या गुंतवणुकीसाठी भारतात ८ दिवस दौरा केला, तेलंगणा सेमीकंडक्टरसाठी, कर्नाटक आयफोन प्रकल्पासाठी अशी अनेक राज्यांची शिष्टमंडळे त्यांना भेटली. परंतु १८-१८ तास जनसेवेची कामे करणारे आमचे धडाकेबाज सरकार #Foxconn च्या CEO यांना का भेटले नसावे ?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2023
आता सध्या रोहित पवार यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. या ट्विटवर अनेकजण वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
बिबट्याची दहशद! थेट घरात घुसला अन्…”, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ