मुंबई : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. पण शपथ घेऊन अनेक दिवस उलटूनही शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. अशातच शनिवारी (६ ऑगस्ट) शिंदे व फडणवीस दोन दिवसासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले.या दौऱ्याबद्दल एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले हा दौरा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाही.
दिल्लीत विमानतळावर पोहचल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले. “दिल्लीत होणारी बैठक शासकीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवबाबत बैठक ठेवली आहे आणि उद्या नीती आयोगाची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक दरवर्षी होते. या दोन्ही महत्त्वाच्या बैठका असल्याने मी दिल्लीला आलो आहे.”
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे त्यात काही अडचण नाही पण सध्या मी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवबाबत आणि नीती आयोगाची बैठक या दोन बैठकींसाठी दिल्लीला आलो आहे.