
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल विधानसभेत खास त्यांच्या शैलीत भाषण केले. यावेळी त्यांनी मोदी सरकार व शिंदे-फडणवीस सरकार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेव ठाकरे यांच्या स्मारकांचा विषय छेडला. मागच्या पाच वर्षात शिवस्मारक का झाले नाही ? असा प्रश्न त्यांनी काल विधानसभेत उपस्थित केला.
वयोवृद्द आजोबांनी बच्चू कडू यांची गाडी आडवली आणि म्हणाले, तुम्ही गद्दार…” पाहा VIDEO
यावेळी ते म्हणाले की, ” छत्रपती शिवाजी महाराज ( Chh. Shivaji Maharaj) यांचे फोटो लावून तुम्ही 2014 ला मते घेतली. ही मते घेण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज आठवतात. त्यावेळी मते मिळवण्यासाठी तुम्ही घाईने स्मारकाची घोषणा व जलपूजन केले. कारण तुम्हालासुद्धा माहित आहे की 350 वर्षे झाली छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की उभा महाराष्ट्र नतमस्तक होतो.”
उर्फी जावेदच्या ड्रेसचे नाव शीला की जवानी? व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
हे सगळं समोर ठेवूनच तुम्ही राजकारण करत आहात. मागच्या पाच वर्षात अरबी समुद्रातील शिवस्मारक का झालं नाही? असेही अजित पवार ( Ajit Pawar) म्हणाले. यावेळी त्यांनी इंदू मिलमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचाही व बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचाही सरकारला विसर पडला असल्याचे सांगितले.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसब्यातुन रविंद्र धंगेकर विजयी होणार? एक्झिट पोल आला समोर