Site icon e लोकहित | Marathi News

कृष्णापुर ते ढाणकी नाला रुंदीकरण व खोलीकरण प्रशासनाकडे वारंवार निवेदन करूनही अद्याप मंजूर केले नाही!

Widening and deepening of Krishnapur to Dhanki canal has not been approved yet despite repeated representations to the administration!

(जिल्हा प्रतिनिधी: संदीप जाधव)

जुलै महिन्याच्या आधी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण न केल्यास आत्मदहन करणार असे वक्तव्य केले माजी सैनिक उत्तम मोहन सिंग राठोड व इतर तीन शेतकरी शामील! परिपत्र निवेदन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस व ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री यवतमाळ, जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यवतमाळ, आमदार श्री नामदेव ससाने साहेब उमरखेड महागाव विधानसभा, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व, जलसंधारण विभाग यवतमाळ यांना निवेदन देऊनही अद्याप मंजुरात मिळाली नाही.

Video: “नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे अॅक्शन मोडमध्ये तर…”, घर बंदूक बिरयानी’ चा ट्रेलर पाहिला का?

संदर्भ: श्री उत्तम मोहन सिंग राठोड माजी सैनिक दिनांक २३/०२/२०२२ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय टांगा चौक यवतमाळ यांचे पत्र क्रमांक.११७७/जिसै क का/१ उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद् व जलसंधारण उपविभाग उमरखेड यांच्याद्वारे प्राप्त अंदाजपत्रक. उपरोक्त संदर्भीय विषयन्वये मौ. पिरंजी ते करंजी तालुका उमरखेड येथील स्थानिक नाल्यावरील खोलीकरण व रुंदीकरणाचे करार टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये झालेला होता त्यानुसार टाटा ट्रस्ट यांनी प्रथम टप्प्यात पीरंजी ते कृष्णापूर पर्यंत खोलीकरण व रुंदीकरण काम पूर्ण झाल्यामुळे खालील शेतकऱ्यांचे पूरग्रस्त मध्ये ऑटोकाठ नुकसान होत आहे.

सगळं ठरलंय! लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज

त्याकरिता कृष्णापुर ते ढाणकी नाला रुंदीकरण व खोलीकरण तात्काळ केले पाहिजे अन्यथा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. सखोल पाण्याचं दुष्काळ हे कितपत झेलायचं त्याकरिता आम्हा सर्वांना संताप होत आहे काम पूर्ण न केल्यास आत्मदहन करेल वक्तव्य करताना माजी सैनिक उत्तम मोहन सिंग राठोड, श्री. नरेंद्र तुळशीराम राठोड , श्री. विकास नामदेव राठोड, सौ. झामीबाई तुकाराम राठोड. हे सर्व आत्मदहांमध्ये सहभागी होते.

सोलापूरची ‘ही’ प्रसिद्ध भेळ तुम्ही खाल्लीय का? ‘या’ स्वस्तात मस्त चवदार व पोटभर भेळीचा एकदा आस्वाद घ्याच!

Spread the love
Exit mobile version