बिहार: बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने (wife) आपल्या प्रियकरासह (boyfriend) मिळून पतीचा चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना कुधनी पोलीस (police) ठाण्याच्या हद्दीतील अख्तियारपूर परिया गावात घडली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाईल.
‘या’ पिकामुळे चिकनचे वाढणार दर, कारण…
नेमका घटना काय घडली ?
माहितीनुसार, परिया गावातील रहिवासी संजय झा (Sanjay Jha) यांचा विवाह जुली देवीसोबत (Julie Devi) झाला होता. तसेच लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्व काही चांगले आणि आनंदी चालले होते. परंतु जुली देवी ही तिच्या गावात राहणाऱ्या शेजारच्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. पुढे ते दोघेही एकमेकांना गुपचूप भेटू लागले. हे असच रोज चालू होते. दरम्यान एक दिवस जुली देवीचा पती संजय झा याला आपल्या पत्नी आणि शेजारच्या तरुणाच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. हे समजल्यानंतर संजय झा यांनी प्रेमप्रकरणाला विरोध केला.
बाजरीचा भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढला, जाणून घ्या दर
पती संजय झाने वारंवार विरोध करूनही पत्नी जुली देवीने प्रियकराशी भेटणे सोडले नाही. या कारणावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होता. या रोजच्या वादाला कंटाळून पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचला. पती संजय झा हे रोज घराच्या दाराबाहेर एकटेच झोपायचे.पत्नी जुली देवीने याचा फायदा घेत सोमवारी रात्री प्रियकराला भेटण्यासाठी घरी बोलावले. दरम्यान दोघांनी मिळून हत्येचा कट रचून दारात झोपलेल्या पतीचा चाकूने गळा चिरला. यामुळे पती संजय झा यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार; पीक काढणीसाठी लॉन्च केले सर्वात स्वस्त मशीन
दरम्यान सकाळी गावकऱ्यांनी संजय झा यांचा मृतदेह दारात पाहिल्यानंतर त्यांनी कुधणी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी अरविंद पासवान टीम फोर्ससह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कुधनी पोलिस स्टेशनचे एसएचओ अरविंद पासवान यांनी या प्रकरणी सांगितले की, परिया गावातील रहिवासी संजय झा यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दरम्यान हत्येप्रकरणी मृताची पत्नी आणि शेजारच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे.
दसऱ्याला ‘या’ गावात रामाची नाही, तर रावणाची होते पूजा; तब्बल दोनशे वर्षांपासून परंपरा चालू