सोशल मीडियावर (Social media) दररोज वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ मनोरंजनाचे असतात तर काही दुर्घटनेचे, आणि भांडणाचे असतात .दरम्यान अशातच उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फारुखाबादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या व्हिडिओमध्ये दोन महिला भांडताना (Two women fighting) दिसत आहेत. या दोन महिला एकमेकांसाठी अनोळखी नसून एका व्यक्तीची पत्नी (Wife) आणि त्याची कथित मैत्रीण (girlfriend) आहे.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेरोजगारांना दिल मोठं दिवाळी गिफ्ट! वाचा सविस्त माहिती
घटना अशी घडली की हा माणूस एका महिलेसोबत रुग्णालयात गेला होता. दरम्यान ही महिला त्याची ‘मैत्रीण’ असल्याचे सांगितले जाते. हे दोघं रुग्णालयात पोहचताच थोड्या वेळाने त्या व्यक्तीची धर्मपत्नीही त्याच रुग्णालयात पोहोचते. मग काय आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून त्या पत्नीला राग येतो. दरम्यान ती पत्नी त्या महिलेला मारहाण करू लागल्यानंतर तो व्यक्ती त्या दोघींना शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या दोघी त्याच ऐकतच नाही आणि अजून जोरात भांडायला सुरुवात करतात.
स्मार्टफोन वापरताय? मग ऐकाच, गुगलने प्ले स्टोअर वरून हटवल्या ‘या’ 16 अॅप्स; कारण…
मग काय या दोघीही ऐकत नसल्याने त्याने आपली चप्पल काढली आणि त्या दोघींना मारायला सुरुवात केली. त्यानंतर या दोघीही शांत झाल्या आणि तो व्यक्ती पत्नीसह तेथून निघून गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरतर ही घटना फारुखाबादच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर काय कारवाई करण्यात आली, हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान याबाबत तपास सुरू आहे.
व्हॉट्सअॅप नक्की बंद पडलं की हॅक झालं? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय करणार सखोल तपास