मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव चांगलेच वाढले (Tomato Price Hike) आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. परंतु सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोमुळे (Tomato) भाजी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु आता टोमॅटोवरून नवरा आणि बायकोमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)
धक्कादायक! विषबाधा होऊन ४१ जनावरांचा मृत्यू
माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. संजीव बर्मन हे टिफिन सर्व्हीसचा व्यवसाय करतात. त्यांनी घरी जेवण बनवताना अवघ्या २ टोमॅटोचा वापर केला होता. यावरून त्यांचे आणि त्यांच्या बायकोचे खूप भांडण झाले. त्यांच्यातला हा वाद वाढतच गेला आणि त्यांची बायको मुलीसह घरातून निघून गेली. त्यामुळे संजीव यांना खूप मोठा धक्का बसला.
“जर टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी काही मरणार नाही”, रविकांत तुपकर चांगलेच संतापले
त्यानंतर त्यांनी बायको आणि मुलीचा शोध घेतला परंतु त्याचा त्यांना शोध लागला नाही. अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून बायको आणि मुलगी सापडत नसल्याची दाखल केली. तक्ररीवरून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवले नाहीतर २६/११ सारखा हल्ला केला जाईल; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
हे ही पहा