Site icon e लोकहित | Marathi News

Satara Loksabha Election । अजितदादा बालेकिल्ला सोडणार? आज होणार महत्त्वाचा निर्णय

Satara Loksabha Election

Satara Loksabha Election । केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर करताच सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. अजित पवार गटाने या जागेवरचा दावा अजूनही सोडला नाही. याबाबत आज निर्णय होणार आहे. (Latest marathi news)

Loksabha Election 2024 । महाविकास आघाडीला मोठा धक्का, हा बडा नेता लढवणार अपक्ष निवडणूक

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी थेट प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. साताऱ्यात आज त्यांचे जंगी स्वागत होणार असून अजित पवार गटाने अजूनही या मतदारसंघावरील जागेचा दावा सोडला नाही. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आज राष्ट्रवादीची (NCP) महत्त्वाची बैठक होत आहे. यात अजित पवार (Ajit Pawar) माढा, सातारा आणि नाशिकच्या जागेबाबत आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार आहेत.

Ram Satpute । प्रणिती शिंदेंबाबत राम सातपुतेंच मोठं वक्तव्य; म्हणाले…

विशेष म्हणजे आजच्या बैठकीत सातारा आणि नाशिकच्या जागेची अदलाबदल करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. दरम्यान, आज उदयनराजे भोसले जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी आपली भूमिका मांडणार आहेत. अशातच उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार या मतदारसंघावरील दावा सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar । सुनेत्रा पवारांनी सांगितली अजितदादांची ‘ती’ माहिती नसलेली बाजू, दौऱ्यावेळी उलगडलं स्वभावाचं रहस्य

Spread the love
Exit mobile version