सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात अनेक ट्विस्ट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटन खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत लिहिले की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू…..” सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे. यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
बैलगाडा शर्यतीचा थरार जिंकून बक्षिसात मिळवली थार!
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ट्विटर किंवा अंजलीताई यांना या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार आहे. मी अजून त्यांनी काय ट्विट केलं आहे ते काही वाचलेलं नाही मात्र त्यांनी काही लिहिलं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे”. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
जीवाला धोका असल्याच्या तक्रारीवर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, “आता सध्या ऊन आहे मात्र अजून १५ मिनिटांनी काय होईल हे मी सांगू शकत नाही. १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही”, असं देखील त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
‘तो’ रॅपर गायब झाल्याने कुटुंबीय आहेत काळजीत; जितेंद्र आव्हाडांकडून घेतली अशी मदत