अजित पवार खरंच भाजपमध्ये जाणार का? संजय राऊत म्हणाले, “शेवटी प्रत्येकजण वैयक्तिक मतं…”

Will Ajit Pawar really join BJP? Sanjay Raut said, "Ultimately everyone has personal opinion..."

सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात अनेक ट्विस्ट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटन खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत लिहिले की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू…..” सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे. यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का! ‘त्या’ सामन्यादरम्यान सुर्यकुमार यादव गंभीर जखमी; आयपीएलसह वर्ल्डकप मधूनही होणार बाहेर?

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “अंजली यांना भाजपकडून याबाबत माहिती मिळाली असेल आणि त्यांनी ती सगळीकडे सांगितली. मात्र अजित पवार असं काही करतील असं वाटत नाही”, असं राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

“अगं चंपाबाई धंगेकराला थोडा जीव तरी लावं’” कसबा पोटनिवडणूकीवर तयार झालंय गाणं; पुण्यात होतेय जोरदार चर्चा

“अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे ते जाऊन मिंधेंप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही. शेवटी प्रत्येकजण वैयक्तिक मतं घेत असतो. असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

“एकवेळ असं वाटत होत आयुष्यात काहीच राहील नाही, सगळं संपल…” गौतमीने संगितला तो भयानक किस्सा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *