अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार? शिरसाट स्पष्टच बोलले…

Will Ambadas Danve join the Shinde group? Shirsat spoke clearly...

मुंबई | ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Danave) माझ्या संपर्कात आहेत. कधीही काहीही होऊ शकत असं वक्तव्य संजय शिरसाटांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. दानवे काही दिवसात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं शिरसाट म्हणाले. शिरसाटांच्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा सुरु आहे.

ठाकरे गटातील ‘हा’ मोठा नेता शिंदेच्या संपर्कात,संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

रविवारी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मालेगाव येथे सभा पार पडली. या सभेमध्ये ठाकरेंनी शिंदे गट आणि बंडखोर आमदाराविरोधात भाष्य केलं. तसेच भाजप आणि शिदें गटावर जोरदार टिका केली. उद्धव ठाकरेंच्या या विधानानां उत्तर संजय शिरसाटांनी देखील चागलंच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळत आहे.

धक्कादायक घटना! लग्नाच्या अमिषाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार

मविआकडून (MVA) घेण्यात येणाऱ्या सभांवरदेखील शिरसाटांनी टोला लगावला. प्रत्येक सभेची तयारी ठाकरे गटानं करायची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथे जाऊन भाषणं ठोकायची, असं सगळं सुरू आहे.ज्या शिवसैनिकांनी त्यांच्या रक्तानं वाढवली, मोठी केली त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरा, राष्ट्रवादीच्या लोकांसाठी नको. असा सल्लादेखील शिरसाटांनी (Sanjay Shirsat) ठाकरेंना दिला.

मोठी बातमी! मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग; दोन दुकान जळून खाक

दानवेंचा मला फोन आला होता असं देखील शिरसाटांनी सांगितलं. केव्हाही काही होऊ शकतं असा दावा शिरसाट यांनी केला आहे. शिरसाटांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे. यामुळे खरंच दानवे शिंदे गटात जाणार का? असा सवाल केला जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *