मागील अनेक दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केला असून लवकरच भाजप कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी घेऊन दबाव तंत्राचा पुरेपूर वापर करून भाजपकडून हे कारस्थान रचले जाईल. अशी शंका संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी उपस्थित केली आहे.
उद्धव ठाकरेंना यावेळी ‘ती’ खुर्ची मिळणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले वक्तव्य
अजित पवार अस्वस्थ आहेत व ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) मधील आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत. अशातच संजय राऊतांनी एवढे मोठे वक्तव्य केले आहे. याआधी देखील संजय राऊत यांनी अजित पवार (Ajit Pawar) भाजप सोबत गेले तर त्यांचा मिंधे होईल असे म्हंटले होते. खरंतर यापूर्वी सुद्धा अजित पवार काही तासांसाठी भाजपसोबत गेले होते. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार खरंच भाजपमध्ये जाणार का? खरंच राष्ट्रवादी फुटणार का? या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान, अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावरून देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे. ” अमित शाह महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पाहण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत. खरंतर ही सभा त्यांनी पाहिलीच पाहिजे ” असा खोचक टोला देत संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला डिवचले आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!