Sharad Pawar । भाजप देणार शरद पवारांना जबरदस्त धक्का? विश्वासू नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडणार आहेत. या निवडणुकीपूर्वीच भाजपनं काँग्रेस आणि शरद पवार गटाला धक्क्यांवर धक्के देण्याची योजना आखली आहे. राज्यात भाजपची (BJP) ताकद वाढताना दिसत आहे. याचा मोठा परिणाम हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता शरद पवारांना भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे. (Latest marathi news)

Eknath Shinde । “…तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन रडले” बड्या नेत्याचा दावा

भाजपने पश्चिम महाराष्ट्राकडे (Western Maharashtra) आपला मोर्चा वळवला आहे. शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासू नेता लवकरच पक्षप्रवेश करणार आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. जर नेत्याला भाजपमध्ये आणले तर सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढू शकते. शिवाय त्या नेत्याकडे प्रशासकीय अनुभव चांगला आहे.

Fire news : आई-वडील गेले ऊस तोडणीसाठी बारामतीला, मात्र घरी चिमुकल्यासोबत घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का

त्याने मंत्रिमंडळात महत्वाची खाती संभाळली आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवारांसोबत असणाऱ्या या नेत्याची दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्या नेत्याच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची की त्याच नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं? याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा नेता कोण? अशी चर्चा सुरु आहे.

Sharad Pawar । शरद पवारांना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह परत मिळणार? महत्वाची माहिती समोर

Spread the love