
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली. यांनतर खरी शिवसेना नेमकी कुणाची? हा वाद अजूनही मिटला नाही. यासंदर्भात निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. मात्र आज मोदींच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाणाची प्रतिकृती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
खरी शिवसेना नेमकी कोणाची हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. यावर निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय दिलेला नाही. मात्र हे सर्व चालू असताना मोदींच्या वतीने वतीने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाणाची प्रतिकृती देण्यात येणार आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
कठीण काळात मुकेश अंबानींनी केली मोठी मदत; राखी सावंतचा मोठा खुलासा
दरम्यान, काही वेळामध्येच मुंबईतल्या बीकेसी मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या साठी अनेक नेते आणि कार्यकर्ते बीकेसी मैदानावर जमा झाले आहेत. आता या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सभेआधी बीकेसीमधील कमान कोसळली