Maize Crop: मक्याचे दर टिकून राहतील? पाहुयात नेमकी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

Will corn prices hold up? Let's see what exactly is the international market situation

मका हे पीक खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आता आपण जर मक्याचे बाजारभाव पहिले तर सध्या मक्याला प्रतिक्विंटल 2500 ते 2 हजार 600 पर्यंत भाव मिळतोय.पण आता येणारा काळ मक्यासाठी कसा राहील? आणि सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मक्याचे स्थिती नेमकी काय आहे? याबद्दल माहिती पाहू.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! लम्पी रोगामुळे जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 30 हजारापर्यंत नुकसानभरपाई

आंतरराष्ट्रीय बाजाराचा (International market) विचार केला तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मक्याचे बाजार भाव थोडे कमी झालेले पाहायला मिळाले. देशांतर्गत बाजारपेठेतही मक्याचे भाव क्विंटलमागे दोनशे रुपयांपर्यंत कमी झाले होते.आपण सध्याचा विचार केला तर अडीच हजार पर्यंत सरासरी भाव मक्याला मिळतोय. त्याचबरोबर जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मागच्या आठवड्यात मका दरवाढ झालेली पाहायला मिळाली आहे. महत्वाचं म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागाने या वर्षी जागतिक मका उत्पादन कमी राहील असा अंदाज व्यक्त केलाय.

Sanjay Raut: मोठी बातमी! राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

अमेरिकेमध्ये दुष्काळाचा फटका मका पिकाला बसला आहे. त्यामुळे मका उत्पादन 30 दशलक्ष टनांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अमेरिकेचा कृषी विभागाचा अहवालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मकाच्या भावात दिड टक्‍क्‍यांपर्यंत सुधारणा झाल्याची दिसत आहे. आपण जर भारताचा () विचार केला तर आपल्याकडे देखीलअतिवृष्टीचा चांगला बसल्यामुळे उत्पादन कमी करण्याचा एक अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मक्याचे भाव टिकून राहतील असा देखील अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

Eknath Shinde: ‘या’ कारणामुळे मी शिवसेना सोडली”; एकनाथ शिंदे यांनी केलं स्पष्ट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *