मित्रांनो आपल्याला माहीत आहे की प्रमुख कापूस उत्पादक (Cotton Growers) देशांमध्ये अमेरिका, पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि पंजाब, बांगलादेशचा समावेश होत असतो. परंतु यांदाच्या वर्षी या कापूस उत्पादक देशांमध्ये काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती (Flood-like conditions) निर्माण झाली आहे. म्हणून यावेळी कापसाच्या उत्पादनात घट (decline) होणार आहे.
कापूस उत्पादनात घट झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) भारतीय कापसाला जास्त बाजारभाव मिळणार आहे. हा बाजारभाव ऐतिहासिक मिळणार आहे कारण याआधी भारतीय (India) कापसाला जास्त बाजारभाव मिळाला नाही.
यामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यंदा मध्यम धागा कापसासाठी 6080 रुपये, तर लांब धागा कापसासाठी 6380 प्रति क्विंटल हमीभाव शासनाकडून जारी करण्यात आला आहे. परंतु यावर्षी आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघता कापसाला किमान 8 ते 10 हजार रुपये इतका बाजार मिळण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे जर अजूनही दुष्काळी आणि पूर परिस्थितीमुळे कापूस उत्पादनात अजुनच घट झाल्यास कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याचा देखील अंदाज आहे.