गौतमी पाटील सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गौतमीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. अगदी तरुण वर्गापासून ते म्हताऱ्या लोकांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. अगदी थोड्याच कालावधीमध्ये गौतमीने प्रेक्षकांमध्ये स्वतःच एक वेगळंच स्थान निर्माण केल आहे. गौतमी तिच्या नृत्यामुळे सतत चर्चेत असते. गौतमी अनेक मुलाखत देखील देत असते.
अयोध्येत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर तुफान फटकेबाजी; मोठी घोषणा करून दिला धक्का
नुकतीच गौतमीने एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने असं वक्तव्य केलं आहे की सगळीकडे खळबळ उडाली आहे. यावेळी गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे. गौतमी म्हणाली, पहिल्यापासून मी आणि माझी आईच राहिलो आहेत. आमच्या घरात ना वडील ना भाऊ, माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. घरातील सर्व जबाबदाऱ्या मी आणि माझ्या आईनेच घेतल्या आहेत. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे”. अस गौतमी म्हणाली आहे.
मंदिरात आरती सुरू होती अन् अचानक झाड कोसळलं; ७ भाविक जागीच ठार तर ३५ जण गंभीर जखमी
त्याचबरोबर ती पुढे म्हणाली, “मला पैसे वगैरे काही नको फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देणारा जोडीदार हवा. त्यामुळे ज्यावेळी असा मुलगा मला मिळेल त्यावेळीच मी लग्नाचा विचार करेन. लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे”. असं देखील गौतमी म्हणाली आहे.
आदनींसोबतच्या फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले,”कोणत्या अंडरवर्ल्ड डॉनसोबत….”