
लावणी कलाकार गौतमी पाटील(Gautami Patil) मागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत आहे. अगामी ‘घुंगरू’ चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला गौतमीने मुलाखत दिली यावेळी तिने आगामी चित्रपटाची माहिती दिली. तसेच तिचे नवीन लावणी नृत्य देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती दिली.
सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले यावर गौतमीला विचारले असता ती म्हणाली, मला यासंदर्भात काहीही बोलायचे नाही. ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केले होते त्यांना मी सांगते मी यासंदर्भात माफी देखील मागितली आहे आणि आता इथून पुढे अशी चूक होणार नाही. आता एकदम सर्व मस्त चालू आहे. असं गौतमी म्हणाली आहे.
रोहित पवार यांना आवरला नाही हुरडा खायचा मोह; म्हणाले, “थंडी आणि हुरडा हे एक..”
त्याचबरोबर पुढे गौतमीला राजकारणातील प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, ” मला राजकारण आवडत नाही त्यामुळे मी राजकारणात कधीच येणार नाही. माझी कला वेगळी आहे, आणि राजकारण वेगळं आहे.” असं गौतमी पाटील म्हणाली. त्याचबरोबर पुढे ती म्हणाली यापुढे चित्रपट, गाण्यांमध्ये संधी मिळाली तर त्यामध्ये मी नक्की काम करेल.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना समाज द्यावी” – सचिन खरात