
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वत्र डंका वाजवणारा अभिनेता हृतिक रोशन व सबा आझाद यांच्या अफेअरची चर्चा मागील काही दिवसांत सुरु आहे. नुकताच या दोघांचा एअरपोर्टवर किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान या दोघांबाबत एक नवीनच माहिती समोर येत आहे.
नागराज मंजुळेंच्या अजून एका नवीन गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; पाहा VIDEO
हृतिक रोशन व सबा आझाद लवकरच लग्नबांधनात अडकणार असल्याचे म्हंटले जात आहे. एका अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून ही माहिती देण्यात आली आहे. खरंतर हृतिक रोशन व सबा आझाद त्यांच्या लग्नाबद्दल गंभीर आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये व कार्यक्रमात हे दोघे एकत्र हजेरी लावतात.
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर साधला निशाणा; म्हणाल्या, “चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातील व्हिलन…”
सबा आझाद तर हृतिकच्या मुलांसोबत आपला वेळ देखील घालवते. सध्या ते दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. बऱ्याचदा सबा आझाद हृतिक पेक्षा लहान दिसते असे म्हणून ट्रोल देखील केले जाते. परंतु आता ते दोघे लग्न करणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात या दोघांचा विवाह होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“एका महिलेने चिंचवडमध्ये पाडलं”, निलेश राणे यांची अजित पवारांवर जोरदार टीका
ह्रतिकने नुकतेच एक नवीन घर देखील घेतले आहे. शाहरुखच्या मन्नत या बंगल्याजवळ हे घर असून त्याचे नूतनीकरण सुरू आहे. लग्नानंतर हृतिक रोशन व सबा आझाद ( Hritik Roshan & Saba Aazad) याच घरात राहणार असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांकडून चौकशी सुरू; घटनेचे CCTV फुटेज देखील आले समोर