Site icon e लोकहित | Marathi News

IMD Alert । पुढील महिन्याच्या सुरूवातीला पाऊस पडणार? जाणून घ्या पुणे हवामान खात्याचा अंदाज

Will it rain at the beginning of next month? Know Pune Meteorological Department forecast

IMD Alert । पुणे : राज्यात काही दिवसांपासून पावसाने (Rain in Maharashtra) दडी मारली आहे. पावसाअभावी हाताशी आलेली पिके जळू लागली आहेत. शेतीसोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिके धोक्यात आल्याने चारादेखील महाग झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन चारा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे (Rain) लागले आहे. (Latest Rain Update)

Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेपूर्वी रोहितचं मोठं विधान, म्हणाला; “पुढील दोन महिने…”

अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचे दमदार आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. पावसासाठी राज्यात (Rain Update) पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निर्णाण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का! या पाच नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

राज्यभरात 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. त्याशिवाय पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

Onion Rate । शेतकऱ्यांची चिंता वाढली, नाफेडकडून अजूनही कांद्याची खरेदी नाही

पुढील महिन्यात होणार पावसाचे आगमन

राज्यामध्ये पुढील पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट आले आहे. परंतु पुढील महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले; “मी अजूनही दारूला स्पर्श केला नाही”

Spread the love
Exit mobile version