राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) सध्या चर्चेत आहेत. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करताना केलेल्या राड्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 72 तासांत एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत मला अटक होऊ शकते’ असे विधान आव्हाड यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
राखी सावंतचे लग्न धोक्यात; स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत किंवा त्यानंतर काही महिने मला जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. सध्या माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. मात्र, तरीही ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटते “
“कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा”, कोयता गँगला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची फिल्डिंग
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर (State Governmet) देखील गंभीर टीका केली आहे. राज्यावर सध्या सहा लाख ६६ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ते दर दिवशी वाढत आहे. जर अशाच पद्धतीने राज्य चालले, तर महाराष्ट्र दिवाळखोर होईल. दरम्यान केंद्र सरकारने मोफत धान्य आणि मोफत रेशन दिले आहे. परंतु, मोफत देऊन काही होत नाही. तुम्ही राज्यातील हातांना काम द्या. या कामाने त्यांच्या घरात रेशन जाऊ शकते. तसेच जो मोफत देता तो पैसा तुम्ही घरून आणता का ? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
अर्थसंकल्प सादर होताच विवेक अग्निहोत्रींची दिली प्रतिक्रिया; म्हणाले…