Manoj Jarange Patil । मोठी बातमी! राज्याच्या राजकारणाला लागणार वेगळं वळण? जरांगे पाटलांकडे आला मोठा प्रस्ताव

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । ऐन निवडणूक काळात (Loksabha election 2024) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच राज्यातल्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार गटाचे उमेदवार अखेर ठरले? शनिवारी यादी येणार समोर?

नुकतीच जालन्यामध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला जालन्यातील मराठा आंदोलक पदाधिकारी देखील उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलन (Maratha reservation) करत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता आज करणार भाजपमध्ये प्रवेश

जालन्यातून लोकसभेला उमेदवार द्यायचा का नाही किंवा स्वत: निवडणूक लढवायची का? याचा उद्या गावागावातून अहवाल येणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर करेन, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागणार का? यावर चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Sanjay Shirsat । ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शरद पवारांनी लावलं भांडण, शिंदे गटाच्या बड्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

Spread the love