Maratha Reservation । एकीकडे मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे जालना येथील झालेल्या लाठीहल्ल्यानंतर (Jalna Protest) सरकारविरोधात मराठा समाजात संतापाची भावना वाढली आहे. “आज जर सरकारने कोणता निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही”, अशी आक्रमक भूमिका आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी घेतली आहे. (Latest Marathi News)
Drink Before Brushing Teeth । सकाळी ब्रश न करता पाणी पिणे कितपत फायदेशीर? जाणून घ्या एकाच क्लिकवर
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती गठीत केली होती. त्यामुळे आज मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो.
या बैठकीला मराठा आरक्षण मंत्री उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना देखील बोलावलं आहे. जालना येथे झालेल्या प्रकरणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीची तडकाफडकी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Uorfi Javed । कहरच! उर्फीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सना फुटला घाम, अभिनेत्रीने चक्क घातला…
या मुद्द्यांवर होणार चर्चा
राज्य सरकारने या बैठकीमध्ये मराठा समाजातील लोकांची वंशावळ, मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात झालेले करार, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Adulterated milk । नागरिकांच्या जीवाशी खेळ, भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश