
NCP | अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तसेच काही नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली. यामुळे काही आमदारांनी थेट निर्णय न घेता तटस्थतेची भूमिका घेतली आहे. शरद पवारांना सोडून जात येत नाही आणि अजित पवारांना विरोध करता येत नाही त्यामुळे ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी या आमदारांची तसेच काही पदाधिकाऱ्यांची अवस्था झाली आहे. (Latest Marathi news)
सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
मात्र, आता अजित पवार यांची साथ देणाऱ्या एका नेत्याने निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर आणखी एका आमदार आणि खासदारानेही तशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
बुलढाणा अपघाताबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या अपघातावेळी नेमकं काय घडलं?
जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) त्याचबरोबर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे तीन नेते निवडणूक लढवणार नसल्याचे समोर आले आहे. या नेत्यांनी यांबद्दल काही वक्तव्ये देखील केली आहे. त्यावरून हे नेते निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
काही सेकंदातच घरे, मोठी दुकाने वाहून गेली, शिमल्यात मुसळधार पावसाचा कहर; व्हिडीओ पाहून बसेल धक्का
हे ही पाहा –