
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीसह मराठी मालिका विश्वात रोज नवनवे ट्विस्ट येत असतात. दरम्यान अशातच झी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Tuzi Majhj Reshingath) या मालिकेने थोड्याच दिवसांत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षक या मालिकेतील यश-नेहाची (Neha and Yash) जोडी आणि परीवर भरभरुन प्रेम करतात. दरम्यान सध्या मालिकेत एक वेगळा वळण आल आहे. यामध्ये यश आणि नेहाच्या गाडीला अपघात (accident) झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातातील या यश तर बचावतो. मात्र नेहा अजूनही बेपत्ता असून तिचा सगळेजण शोध घेत आहेत मात्र ती कुठेच सापडत
नसल्याचं दाखवण्यात आलं आहे.
मित्राच्या वाढदिवसानिमित्त फिरायला जाणे पडले महागात, धबधब्याच्या पाण्यात बुडून चार मित्रांचा मृत्यू
दरम्यान नव्या भागात तिला मृत म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु मालिकेतील या कथानकामुळे प्रेक्षक नाखुश झाले आहेत. त्यामुळे आता कदाचित मालिकेत नेहाची एंट्री पुन्हा होणार आहे. परंतु नेहा आता एका नव्या (new look Neha) रूपात आपल्याला दिसणार अशी शक्यता आहे. कारण झी वाहिनीने नेहाचे म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नव्या रुपातले फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. इतकंच नाही तर त्यावर कॅप्शन दिला आहे ही ‘नेहा की दुसरी कोण’?. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिलासादायक! पुढील ४८ तासांत मिळणार मान्सूनपासून सुटका
नुकतच ‘बस बाई बस’ या कार्यक्रम प्रार्थना बेहरे सहभागी झाली होती. दरम्यान या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. प्रार्थनाने तिच्या हसण्यापासून ते वैभव तत्त्ववादीसोबत लग्नाच्या चर्चांवर बोलली आहे. प्रार्थना मूळची बडोद्याची आहे, अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. प्रार्थनाने अभिषेक जावकरशी २०१७ साली लग्नगाठ बांधली.
Ketaki Chitale: “10 वर्षांनंतर मला तुरुंगात…” पुन्हा एकदा केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत