अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajkta Mali) होय. अनेक सिनेमे आणि मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ताने चहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा; म्हणाले, “अजित दादा जिकडे जाणार तिकडे…”
प्राजक्ता माळी हिने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधताना एक मोठा वक्तव्य केला आहे. प्राजक्ताला बॉलीवूडचा भाईजान सलमान खानशी (Salman Khan)लग्न करण्याची इच्छा असल्याचं तिने व्यक्त केला आहे. ही बातमी ऐकताच मनोरंजन विश्वास मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान या अगोदर प्राजक्ताने तिला वैभव तत्ववादी आवडत असल्याचे सांगितले होते.
प्राजक्ता म्हणाली की, मला खान आवडायचा. मी अगदीच लहान होते. म्हणजे दोन-तीन वर्षाची असेल. माझ्या आतेभावाचा तो आवडता हिरो होता. त्यावेळी मी लहान असताना मला सलमान खानची लग्न करायचा आहे, असे म्हणायचे. हे सांगत असताना प्राजक्ताला काही जुन्या दिवसांची आठवण झाली. त्यावेळी तिने खळखळून हसत हसत काही किस्से शेअर केले.
अजित पवार पुण्यातील दौरा रद्द करून गायब! राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता; चर्चांना उधाण
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी विषयी बोलायचं झालं, तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. तसेच ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ता सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर १.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. याशिवाय प्राजक्ता तिच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
१२ वर्षांच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Video