
Rahul Gandhi । मोदी (Modi) आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून याप्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकार (Gujarat Govt) आणि भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या नोटीसला त्यांना दहा दिवसांत उत्तर द्यावे लागेल. जर सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळाला नाही तर त्यांना 2031 पर्यंत कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. (Latest Marathi News)
दिलासादायक बातमी! १५ ऑगस्टपर्यंत मिळणार सरसकट कांदा अनुदान
गुजरातच्या सुरत न्यायालयाकडून (Surat Court) या प्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती पीके मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली असून पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
धक्कादायक! खालापूर दरड दुर्घटनेतील मृतांमध्ये भवर आणि पारधी कुटुंबातील सर्वाधिक सदस्य
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधींनी एका आयोजित सभेत मोदी आडनावावरून एक वक्तव्य केले होते. वक्तव्यावरून आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. समजा येत्या काही दिवसांत राहुल गांधींना कोणताही दिलासा मिळाला नाही तर त्यांना दोन वर्षांच्या शिक्षेनंतर पुढील सहा वर्षे म्हणजे २०३१ पर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या चार नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या