पुण्यात विधानसभा पोटनिवडणूक पार पडल्यानंतर आता लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. पुण्याचे ( Pune) दिवंगत खासदार गिरीश बापट ( girish Bapat) यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिकामी झाली आहे. या जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
धक्कादायक प्रकार! तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात घुसला साप, पाहून डॉक्टरही हादरले…
या निवडणुकीच्या मैदानात कोण उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणूकीत ऐतिहासिक विजय मिळवलेले आमदार रवींद्र धंगेकर यांचे देखील नाव खासदारकीसाठी समोर येत आहे.
गौतमीने स्पष्टच सांगीतलं तिला कसा नवरा पाहीजे; म्हणाली, “पैसे बंगला…”
दरम्यान लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात रवींद्र धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंढरपूर दौऱ्यावर असताना आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.
अदानी समुहाबाबत अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…
तसेच यावेळी त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. भाजपने निवडणुकांपूर्वी सर्वसामान्य लोकांना दिलेल्या अश्वासनांची पूर्तता केली नसून देशात आणि राज्यात मोदी सरकार विरोधात लाट तयार झाली आहे. असे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) म्हणाले आहेत.