भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. मात्र ऋषभ परत क्रिकेट खेळू शकेल का हा प्रश्न सर्वांना पडलाय.
सचिन तेंडुलकर यांनी घेतला चुलीवरील स्वयंपाकाचा आस्वाद; पाहा VIDEO
माहितीनुसार, ऋषभला गुडघ्याला त्याचबरोबर घोट्याला देखील गंभीर जखम झाली आहे. आणि ऋषभ हा उत्कृष्ट विकेट कीपर आणि बॅट्समन आहे यासाठी गुडघ्याची जखम होणं थोडं अवघड असतं. कारण विकेट कीपरला बॅट्समनच्या मागे वारंवार उठावे आणि बसावे लागते. त्यामुळे आगामी काळात ऋषभला क्रिकेट खेळणं अवघड जाऊ शकतं.
ऋषभ पंतन स्वतः सांगितला अपघात नेमका कसा झाला? म्हणाला…
हा अपघात नेमका कसा झाला याबाबत ऋष पंत यान माहिती दिली आहे. ऋषभ पंत म्हणाला आहे की, मी स्वत: गाडी चालवत होतो, गाडी चालवत असतान अचानक मला झोप आली अन् कार रेलिंगला धडकली. आणि कार धडकल्यानंतर तो विंग स्क्रीन तोडून बाहेर आला, असं पंतनं सांगितलं आहे.
क्रिकेटर पंतच्या अपघातानांतर का भडकली रोहित शर्माची पत्नी?
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हम्मादपुर जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना ऋषभच्या कारचा अपघात झाला. तो स्वतः कार चालवत असून त्याला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ऋषभ पंत त्याच्या आईला भेटायला निघाला होता. दिल्लीहून रात्री उशिरा तो एकटाच त्याच्या कार मधून एकटाच निघाला होता. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली. माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे.