राजकीय वर्तुळात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejariwal) यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. लवकरच ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेणार आहेत.
फायनलआधीच चेन्नईच्या ‘या’ बड्या खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, “मला समोर मुंबईची टीम नकोय”
यामुळे भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्रित येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Aambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तसेच राष्ट्रवादी मधील मोठे नेते फुटणार असल्याचा गौप्यस्फोट सुद्धा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
झोपडपट्टी धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! केवळ अडीच लाख रुपयांमध्ये मिळणार घर
राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय दृष्ट्या सर्वात जास्त कमकुवत पक्ष आहे. या पक्षातील मोठे नेते लवकरच भाजपच्या गळाला लागणार आहेत. यामध्ये जयंत पाटील यांच्यासारखे नेते आहेत. सध्या ईडीच्या कारवाई मध्ये राजकीय दबाव कोणावर असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फिचर! चुकीचा टाईप झालेला मेसेज करता येणार एडिट; जाणून घ्या सविस्तर…
राष्ट्रवादी काँग्रेस मधील जयंत पाटील यांना भाजपमध्ये या नाहीतर तुम्हाला अटक करू असा अल्टीमेट दिला तर पाटील भाजपमध्ये जायला कधीही उत्सुक असतील. मात्र ते जेलमध्ये जाण्यास उत्सुक नसतील असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.