Sharad Pawar । अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू आणि सहकारी नेते भाजपसोबत (BJP) सत्तेत सामील झाले आहेत. तरीही त्यांनी हार न मानता पुन्हा पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. पक्ष फुटून दोन महिने उलटले तरीही त्यांना पक्षातील गळती थांबवता आली नाही. अजूनही कार्यकर्ते अजित पवार (Ajit Pawar) गटात सामील होत आहेत. अशातच आता त्यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)
शरद पवार यांचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) हे विश्वासू सहकारी मानले जातात. पक्ष फुटला तरीही ते आपण ठामपणे शरद पवारांच्या पाठीशी आहोत असे सांगितले. परंतु आज कर्जत तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फाळके एकत्र आले होते. त्यावरून आता फाळके अजित पवार गटात सामील होतात की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे.
Mumbai Rain । मोठी बातमी! मुंबईमध्ये पडतोय मुसळधार पाऊस; वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद
पक्षफुटीनंतर फाळके यांनाही अजित पवार गटात सामील करून घेण्याचा प्रयत्न झाला. अशातच आता पुन्हा एकदा फाळके यांच्यासाठीही गळ टाकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री झाल्यांनतर पहिल्यांदाच अजित पवार आज नगर जिल्ह्यात आले होते. त्यांचे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
Manoj Jarange। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला हात जोडून केली ‘ही’ विनंती; म्हणाले, तुम्ही जर…”