Sharad Pawar । शरद पवारांची आंबेगावमध्ये धडाडणार तोफ, ‘त्या’ वक्तव्याचा घेणार समाचार?

Will Sharad Pawar's cannon fire in Ambegaon, will the news of 'that' statement?

Sharad Pawar । पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॉवरफुल नेते अजित पवार (Ajit Pawar) हे महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. लवकरच त्यांचा दौरा आंबेगाव (Ambegaon) मतदारसंघामध्ये असणार आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । महायुतीत पुन्हा धुसफूस, शिंदे गटाचे आमदार भाजपकडे करणार मोठी मागणी

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील तिसरी सभा सप्टेंबर महिन्यात घेणार आहेत. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांचा या मतदारसंघात दरारा आहे. विशेष म्हणजे वळसे पाटलांचे समर्थक देवदत्त निकम आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी शरद पवारांची भेट घेत सभा घेण्याची विनंती केली आहे.

Success Story । इंजिनिअरिंगची नोकरी न करता तिने केला गांडूळ खताचा व्यवसाय, आज आहे करोडोंची उलाढाल

“आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना त्यांना जनतेने एकदाही बहुमत देऊन मुख्यमंत्री केले नाही”, अशी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. त्यावरून पवार गट आक्रमक झाला आहे. अगोदर मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि आता दिलीप वळसे पाटील यांच्यावर शरद पवार निशाणा साधणार आहे.

पाणी प्रश्न शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा! तरीही नातेपुते पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष

Spread the love