NCP Crisis । नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अगोदर शिवसेना (Shivsena) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे. येत्या निवडणुकीत याचे पडसाद उमटू शकतात. खरी राष्ट्रवादी कोणाची? हा निर्णय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)
सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षांवर सुनावणी पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) आणि अनिल पाटील (Anil Patil) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केल्या आहेत. “आमचंही मत ऐकून घेऊन आमची भूमिका समजून घ्यावी, अशी विनंती या हस्तक्षेप याचिकेत केली आहे.
Ambegaon News । शेवटी ती आईच! पोटच्या बाळासाठी बिबट्याशी लढली, अखेर…
यावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजच्या सुनावणीत याचिकांवर चर्चा होईल. या याचिका सुनावणीत घ्यायच्या की नाही कोर्ट ते आज ठरवेल. या याचिका एकत्रित केल्या असल्याने अजित पवार गटाला त्यांचे मुद्दे ठेवायला संधी मिळेल”, असे शिंदे म्हणाले आहेत. जर कोर्टाने अजितदादा गटाला बाजू मांडायची संधी दिली तर ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.