राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet expansion) जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मेळावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी सुमारे तासभर आपले मंत्री आणि आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. दरम्यान, ही चर्चा अचानक मध्यरात्री झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)
महाराष्ट्र पुन्हा हादरला; बुलढाण्यात आठ जणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार
२ जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) आतापर्यंतचे सर्वात बंड करून ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. अगोदर शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात संधी द्यावी लागणार असल्याने दोन्ही पक्षात धुसफूस सुरु झाली आहे. अनेकदा या दोन्ही पक्षातील आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.
टोमॅटोने घेतला जीव! हातपाय बांधून शेतकऱ्याचे संपवले जीवन, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का
अशातच आता या तिन्ही पक्षातील आमदार मंत्री होण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे वरिष्ठांना त्यांची समजूत काढावी लागत आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपल्याच मागण्यांवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा आणखीच वाढत चालला आहे.
शेतकऱ्याचा नादच नाही! एकाच दिवसात टोमॅटो विक्रीतून कमावले तब्बल 38 लाख रुपये
दरम्यान, जर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत शिंदे गटात असणारी नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी शिंदे यांची भेट घेतली असावी अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आता फडणवीस यांना या दोन्ही पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्यात यश येईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा