भारत जोडो यात्रेच्या दणदणीत यशानंतर काँग्रेसचे 85 अधिवेशन सुरू झाले आहे. छत्तीसगड राज्यात हे अधिवेशन सुरू असून यासाठी देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान या अधिवेशनात बोलताना काँग्रेस खासदार सोनिया गांधी ( Soniya Gandhi) यांनी मोठी घोषणा केली आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया!
या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, ” भारतात आजपर्यंत काँग्रेसने लोकशाही मजबूत केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून लोकशाहीची मूल्ये जपण्यास मोठी मदत झाली. मात्र भारत जोडो यात्रा हाच माझ्या राजकीय जीवनातील अखेरचा टप्पा असू शकतो.”
धक्कादायक! पुण्यात ससून रुग्णालयामध्ये दोन गटांत कोयत्याने हाणामारी
यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व नेत्यांचे आभार मानले. तसेच राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या समर्पण व निष्ठेमुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. असे म्हणत राहुल गांधींचे कौतुक सुद्धा केले.
महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
भारतातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. तसेच प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे. यामुळे संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचला आहे आणि पुढचा काळ आणखी कठीण असणार आहे. असे वक्तव्य करत सोनिया गांधीनी भाजपवर निशाणा साधला.
आताची सर्वात मोठी बातमी! अहमदनगरमधील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट