Amit shah with JR Ntr: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर राजकारणात प्रवेश करणार का? अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Will South Superstar Junior NTR Enter Politics? After Amit Shah's meeting, the discussion was sparked

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे (JR Ntr) देशभरात चाहते आहेत. त्याच्या उत्तम अभिनयामुळे चाहते त्याचे सतत कौतुक करत असतात. गृहमंत्री अमित शाह हे सध्या तेलंगणा दौऱ्यावर यावेळी त्यांनी सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची भेट घेतली आहे. त्याचबरोबर अमित शाह (Amit shah) यांनी ‘रामोजी फिल्मसिटी’चे रामोजी राव यांची देखील भेट घेतली. भेटीनंतर गृहमंत्र्यांनी ट्विट करत फोटो शेअर केले आहेत.

Arvind Sawant: राम सातपुते यांच्या ट्विटवर अरविंद सावंत भडकले; असभ्य भाषेवरून भाजपावर जहरी टीकास्त्र !

अमित शाहांनी ज्युनियर एनटीआरची भेट घेतल्यानंतर ट्विटरवरून काही फोटो शेअर केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “हैदराबादमध्ये तेलुगू सिनेसृष्टीतील एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आणि तेलुगू चित्रपटसृष्टीचा हिरा असलेल्या ज्युनिअर एनटीआरची हैदराबाद भेट घेतली. त्याच्यासोबत छान संवादही साधला.”

Shahjibapu Patil: महविकास आघाडीच्या नाच्याच्या खेळात विनायक राऊत नाचत होते का ? शहाजीबापू पाटीलांची बोचरी टीका

नंतर त्यांनी रामोजी राव यांच्यासोबतचे देखील फोटो शेअर केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “श्री रामोजी राव यांचा जीवन प्रवास अतुलनीय आहे. विविध चित्रपट उद्योग आणि माध्यमांसंबंधित लाखो लोकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. आज मी त्यांची हैदराबाद येथील निवासस्थानी भेट घेतली.”

Eknath Shinde: नेमका काय उद्देश आहे शिंदे सरकारचा दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा

सध्या अमित शाह यांचे दोन्ही ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे आता ज्युनिअर एनटीआर राजकारणात सक्रीय होणार का? असा प्रश्न या भेटीनंतर उपस्थित होत आहे. यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *