Site icon e लोकहित | Marathi News

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका बंद होणार?

Will Taarak Mehta's Ulta Chashma series end?

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma) ही छोट्या पडद्यावरील मालिका लोकप्रिय आहे. चाहते या मालिकेला भरभरून प्रेम देतात. मालिकेबरोबर चाहते त्यातील पात्रांना सुद्धा भरभरून प्रेम देतात. या मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा याने मालिकेतून काढता पाय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या मालिकेच्या टीआरपीमध्ये मोठी घसरण चालू आहे अशा चर्चा सुरु आहेत. आता या चर्चाना पूर्णविराम देत दिग्दर्शकाच्या पत्नीने याबाबत भाष्य केलं आहे.

भीमा पाटस साखर कारखान्याचे पहिल्या पंधरा दिवसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक मालव राजदा याच्या पत्नीने सांगितले की, “मालिकेच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही घसरण झालेली नाही. त्यापेक्षा बघणाऱ्यांच्या दृष्टीकोनातील फरकामुळे सर्व घडले आहे. टीआरपीबाबत मला कधी काही समजले नाही. मात्र ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

आफताबला वाजून आलीये थंडी पण कपडे घेण्यासाठी नाहीत पैसे…

दरम्यान, एक दशक पूर्ण झालेली ही मालिका आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात. इतकंच नाही तर या मालिकेतील पात्रे देखील लोकांना आपलीच वाटतात. या पत्रांचा एक वेगळाच चाहतावर्ग पहायला मिळतो. कौटुंबिक व सामाजिक विषय हाताळणारी ही मालिका अगदी विनोदी पद्धतीने दाखवली गेल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

रश्मी ठाकरे यांनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले; ‘या’ मनसे नेत्याचा गंभीर आरोप

Spread the love
Exit mobile version