Shivsena । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्ष फोडत पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिंदेंच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खूप मोठा धक्का बसला. शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगात (Election Commission) धाव घेतली. परंतु निवडणूक आयोगाने शिंदेच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. (Latest Marathi News)
Washim crime । महाराष्ट्र हादरला! पेट्रोल ओतून झेडपी शिक्षकाला जिवंत जाळलं, नेमकं कारण काय?
आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात 18 सप्टेंबरला एक सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने पुढील सुनावणी 3 आठवड्यांनी घेण्याचा निर्णय घेतला. आज ही सुनावणी पार पडणार असून सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह देशाचं लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी गृहीत धरून निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह आणि नाव दिले आहे.