Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana । महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना’ राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेमुळे राजकारणही चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. दरम्यान, ‘माझी लाडकी बहिन योजने’बाबत विरोधकांनी सरकारवर केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. या योजनेचे पैसे वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
Granulated Sugar । खडीसाखर कशी बनवली जाते? आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? जाणून घ्या महत्वाची माहिती
अजित पवार यांनी ट्विट करत लिहिले की, “‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन.” सध्या हे ट्विट चर्चेत आहे.
Sharad Pawar । शरद पवार फडणवीसांना देणार मोठा धक्का; निकटवर्तीयाला दिली पक्षात येण्याची ऑफर
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ शाश्वत नसल्याचा आरोप विरोधी आघाडी महाविकास आघाडी करत आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांनी विरोधकांना चांगलच प्रत्युत्तर दिले आहे. याआधीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माझी लाडकी बहिन योजना’ योजनेच्या यशस्वीतेसाठी जास्तीत जास्त भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले होते.
Assembly Elections । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, अजित पवार टाकणार नवीन डाव