Site icon e लोकहित | Marathi News

सरकार कोसळणार? फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटनं उडाली खळबळ

Will the government collapse? Fadnavis's 'that' tweet created a stir

राजकीय वर्तुळात विविध अफवा आणि चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून राज्यात सुरू होत्या. मात्र खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीकाँग्रेस मध्येच राहू असे अजित पवारांनी सांगितले आहे. दरम्यान या चर्चा सुरू करण्यात भाजपचा मोठा हात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक ट्विट केले आहे. सध्या त्यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बिग ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब; दैनिक ‘सामना’तील नेमका दावा काय?

देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आ.हे या ट्विटमध्ये त्यांनी, दोन फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना. त्याचबरोबर मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देखील दिला आहे. त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत असून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“गौतमीचा तो व्हिडीओ व्हायरल अन् नेटकरी म्हणाले… ” पाहा Video

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाली असून कधीही निकाल येऊ शकतो. यामध्येच फडणवीस यांच्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. यामुळे हे सरकार कोसळणार का? अशा अनेक चर्चा चालू असून तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.

सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला फोन

Spread the love
Exit mobile version